Homeमहाराष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या २८७ व्या अवतरण दिनानिमित्त पाथर्डीत ऐतिहासिक उत्सव

संत सेवालाल महाराजांच्या २८७ व्या अवतरण दिनानिमित्त पाथर्डीत ऐतिहासिक उत्सव

कीर्तन, भजन आणि महाप्रसाद, पाथर्डीत रंगणार संत सेवालाल जयंती उत्सव

विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि महान संत सेवालाल महाराज यांचा  २८७ वा अवतरण दिन सोहळा पाथर्डी शहरात मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी जगदंब सेवालाल भक्त मंडळ आणि सकल बंजारा समाज, पाथर्डी यांच्या वतीने जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

पूर्वसंध्येला भक्तिसंगीताचा कार्यक्रम

सोहळ्याची सुरुवात शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून रात्री ८ वाजता प्रबोधनकार नामदेव महाराज ठाकरवाडीकर यांच्या सुमधुर बंजारा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भक्तिरसाने या कार्यक्रमाची सुरवात होईल कार्यक्रमामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होणार आहे. मेजर देवीचंद पवार व पवार परिवाराच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी मुख्य सोहळ्याची धूम

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. शहरातील वसंतराव नाईक चौक येथून जगदंबा देवी व सेवालाल मंदिर (आनंदनगर) पर्यंत ‘सेवालाल लीलामृत ग्रंथ’ आणि पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘जय सेवालाल’च्या जयघोषात निघणारी ही मिरवणूक शहराचे लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळी १० वाजता ह.भ.प. शितलताई साबळे पाटील (रामपूरकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यांना गानकोकीळा नंदिनीताई सांगळे, पांडुरंग महाराज आळंदी आणि संस्थेतील विद्यार्थी संगीत साथसंगत करणार आहेत. कीर्तनानंतर दुपारी १२ वाजता मेजर देवीचंद पवार व पवार परिवाराच्या सौजन्याने भाविकांना महाप्रसाद व फराळाचे वाटप करण्यात येईल.

उपस्थितीचे आवाहन

या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजबांधवांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वसंतराव नाईक वाचन मंदिर व जगदंब सेवालाल भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाथर्डी शहरात संत सेवालाल महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!