Homeताज्या बातम्यामुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकून दोन वेळा पलटी,...

मुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकून दोन वेळा पलटी, चालक जखमी

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर १३ जून रोजी शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बीएमडब्ल्यू कार नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडकली आणि दोन वेळा पलटी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारचे चालक विकास सोनवणे आहेत. ते कोल्हापूर येथील अन्न निरीक्षक असून अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, गाडीने अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट दुभाजकावर आदळली. त्यानंतर कार दोन वेळा हवेत पलटी झाली. हा भयावह प्रकार पाहून अनेकांनी श्वास रोखून धरला. या अपघातामुळे काही काळ कोस्टल रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below 👆👆

या अपघातामुळे कोस्टल रोडवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून या मार्गावर योग्य ती सुरक्षा उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!