Homeमहत्त्वाचेशरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला फोनद्वारे संवाद

शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला फोनद्वारे संवाद

Times Of Maharashtra Desk:राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने सध्या पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी फोन करून विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
प्रकृती उत्तम आहे!
शरद पवार यांना सोमवारी बारामतीहून पुण्यात आणण्यात आले होते. प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्यानंतर त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून, कोणतीही गंभीर बाब नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.रुबी रुग्णालयातील डॉ. सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात लक्षणीय सुधारणा होत आहे. त्यांना खोकल्याचा त्रास होत होता, मात्र सध्या अँटिबायोटिक्स उपचार सुरू असून त्यांचा त्रास कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, रुग्णालयाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज-उद्या डिसचार्ज मिळणार
गेल्या काही तासांत प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे शरद पवार यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही प्रत्यक्ष भेटून शरद पवार यांची चौकशी केली. सुनेत्रा पवार उद्या रात्री दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर ही भेट होणार असून, या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व दिले जात आहे. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही सोबत असणार असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!