Homeताज्या बातम्यास्विच’ बाइक्सचा पुण्यात विस्तार ; डीएके ऑटोमोटिव्हज’सोबत भागीदारी ; ‘सीएसआर ७६२’च्या सादरीकरणासह...

स्विच’ बाइक्सचा पुण्यात विस्तार ; डीएके ऑटोमोटिव्हज’सोबत भागीदारी ; ‘सीएसआर ७६२’च्या सादरीकरणासह ‘स्विच मोटोकॉर्प’करणार विस्तार

स्विच’ बाइक्सचा पुण्यात विस्तार ; डीएके ऑटोमोटिव्हज’सोबत भागीदारी

‘सीएसआर ७६२’च्या सादरीकरणासह ‘स्विच मोटोकॉर्प’करणार विस्तार
 
पुणे : बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत यशस्वी सादरीकरण केल्यानंतर आता ‘स्विच मोटोकॉर्प’ला (Svitch) पुण्याची बाजारपेठ खुणावत असून, ‘सीएसआर ७६२’ या प्रीमियम दुचाकी इलेक्ट्रिक बाइकसह कंपनी ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी कंपनीने ‘डीएके ऑटोमोटिव्हज’समवेत भागीदारी केली आहे. ‘स्विच’च्या बाइकमध्ये ग्राहकांना कामगिरी, स्टाइल आणि शाश्वततेचा अनुभव मिळेल, अशी कंपनीला खात्री आहे.
तंत्रस्नेही आणि पर्यावरणविषयक जागरूकतेसाठी ओळखले जाणारे पुणे ‘स्विच’च्या वाटचालीमध्ये मैलाच दगड ठरण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बाइक्सची वेगाने वाढणारी मागणी पाहता ‘स्विच मोटोकॉर्प’ ‘सीएसआर ७६२’ ही प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक सादर करीत आहे.
‘पुण्यातील आमचे हे पाऊल केवळ व्यावसायिक उपक्रम नसून, इलेक्ट्रिक वाहनांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे,’ असे ‘स्विच मोटोकॉर्प’चे संस्थापक राजकुमार पटेल यांनी सांगितले. आम्ही आमच्या बाइकच्या माध्यमातून पुणेकर ग्राहकांचा रायडिंगचा अनुभव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आणि शहरात वेगाने विस्तारणाऱ्या ‘ईव्ही इकोसिस्टीम’चा भाग होण्यासाठी इच्छुक आहोत, असेही पटेल यांनी नमूद केले.
‘चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत  देशातील प्रथम (टिअर वन) आणि द्वितिय (टिअर टू) श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तार करण्याचा ‘स्विच मोटोकॉर्प’चा विचार असून, या शहरांमध्ये १५ नवीन शोरूमची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये नवीन टचपॉइंट तयार करून १०० किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस नेटवर्कचे जाळे उभारण्याचाही आमचा प्रयत्न आहे,’ असेही राजकुमार पटेल यांनी नमूद केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!