Homeताज्या बातम्याAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'वॉर रूम' थंडावली

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘वॉर रूम’ थंडावली

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेली ‘वॉर रूम’ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून थंडावली आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन व अन्य प्रकल्पांच्या कामांवर वॉर रूमच्या माध्यमातून नियंत्रण व देखरेख ठेवली जाते.

शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रूम सुरू असतानाही पवार यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयातही वॉर रूम सुरू केली होती. पुणे शहर व जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पासह रस्तेविकास महामंडळाचे १२-१३ प्रकल्प व अन्य काही प्रकल्पांच्या कामांवर पवार यांच्या कार्यालयातील वॉररूमच्या माध्यमातून देखरेख सुरू होती. पवार यांनी तत्कालीन मुख्य सचिव, विविध खात्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्या बैठकाही घेतल्या होत्या व वॉर रूमच्या बैठकांना हे अधिकारी उपस्थित राहात होते. पवार यांनी या बैठकांमध्ये वेळोवेळी निर्देशही दिले होते.

मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या कार्यालयात ‘वॉर रूम’ सुरू झाली आहे. त्यात अनेक मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन व अन्य प्रकल्पांवर देखरेख ठेवून कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येत आहे आणि वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले जात आहेत. पवार यांच्या वॉर रूममध्ये समावेश असलेल्या पुणे रिंगरोडसह अन्य काही प्रकल्पांचा आढावा फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वॉर रूमच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून पवार यांनी वॉर रूमच्या बैठकाही घेतलेल्या नाहीत. त्यामुळे पवार वॉर रूम गुंडाळली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून पुणे शहर व जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामांवर ते देखरेख ठेवू शकतात. पण पुणे रिंगरोडसह काही प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमकडून नियंत्रण ठेवले जात असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. सरकारचा शपथविधी झाल्यावर नागपूर अधिवेशन झाले, मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरण व अन्य कामे सुरू आहेत. अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांशी व इतरांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी बैठका घेतल्या आहेत आणि सध्या ते अर्थसंकल्पाच्या कामात व्यस्त असल्याने वॉररूमची बैठक झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या कार्यालयास जागेचा तुटवडा

अजित पवार यांच्या कार्यालयास जागेचाही तुटवडा जाणवत असून सातव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयाकडे असलेली दालने मुख्यमंत्री कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यामुळे दहा-बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसायचे कोठे, हा प्रश्न निर्माण झाला होता. मुख्यमंत्री वैद्याकीय कक्षासाठी ही जागा घेण्यात आली होती. मात्र अजित  पवार यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी निर्देश दिले व पवार यांच्याकडे या दालनांचा ताबा तूर्तास कायम ठेवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!