Homeक्राईमकोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव...

कोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव…

त्रयस्थांनी केली मिळकतीवर नुकसान ; त्रयस्थांनी ठेवले होते धारधार हत्यारे…

कोंढवा पुणे : कौसरबाग येथील ब्रह्माकाउंटी जवळील सर्वे क्रमांक 31 या मिळकतीवर काही अज्ञात त्रयस्थांनी अनधिकृतरित्या शिरकाव करून जागा बळकावण्याचा प्रकार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर जागा ब्रह्मा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असून, या मिळकतीसंबंधी सर्व वैध कागदपत्रे, सातबारा आणि अन्य दस्तऐवज कंपनीकडे उपलब्ध असल्याचे ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकीलांनी सांगितले.

प्रकरणाचा तपशील असा की, काही गावगुंडांनी मिळकतीवर जबरदस्तीने ताबा मिळवून तेथे धारदार शस्त्रे, कोयते, चाकू इत्यादी ठेवले. यामुळे जागेवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी केल्याची माहिती वकिलांनी दिली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी मीडियासमोर व्यक्त केली.

मिळकतीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने त्रयस्थांनी जमिनीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर केले नसून उलट तेथील संरचनेचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे आमच्या पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे वकिलांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असे प्रकार घडले होते. त्या कारणाने त्या काळात जागेवर कोणी उपस्थित नसल्याचा फायदा घेऊन हा बेकायदेशीर शिरकाव केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून सदर मिळकतीवरील अनधिकृत कब्जा दूर करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे.

ह्या प्रकरण बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षक गुन्हे जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आणि त्या ठिकाणाहून निघून गेले.

मुख्य मुद्दे –  ब्रह्मा बिल्डकॉनच्या जागेवर त्रयस्थांचा अनधिकृत कब्जा

त्रयस्थांकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आरोप

जागेवर धारदार शस्त्रे ठेवून धमकीचा प्रकार

सुरक्षा रक्षकाला मारहाण; एफआयआर दाखल

अद्याप पोलिसांकडून कारवाई नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!