Homeक्राईमPune City Crime: शहरात कायदा-सुव्यवस्था धाब्यावर? सिंहगड कॉलेज परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

Pune City Crime: शहरात कायदा-सुव्यवस्था धाब्यावर? सिंहगड कॉलेज परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे शहरात हत्येचे सत्र सुरूच असून, गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाजीराव रस्त्यावर झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच, आता सिंहगड कॉलेज परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सय्यद असून त्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ ही घटना घडली. आरोपीने सय्यद याच्यावर हल्ला करताना कोयता आणि कुंड्याचा वापर केला आणि अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेह परिसरात टाकून घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांत पुण्यात खूनांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भरदिवसा बाजीराव रस्त्यावर मयांक खराडे नामक तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. अशा लागोपाठच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

error: Content is protected !!