Homeआरोग्यवैनगंगा पुलावर मद्यधुंद चालकाचा थरारक अपघात; पोलीस हवालदार गंभीर जखमी

वैनगंगा पुलावर मद्यधुंद चालकाचा थरारक अपघात; पोलीस हवालदार गंभीर जखमी

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात घडला असून, मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाच्या बेफिकीरपणामुळे एका पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार कृनाल भाऊराव हेमके (वय ४५, रा. समता कॉलनी, ब्रह्मपुरी) हे रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने आरमोरीकडे जात होते. ते वैनगंगा पुलावर पोहोचताच समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओने अचानक चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत हेमके हे काही अंतरावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ चालक पूर्णतः मद्याच्या नशेत होता. नशेतच त्याने वाहनावर नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर जखमी हवालदाराला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जखमी हेमके यांच्या पत्नी सौ. भावना हेमके यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८४, १३४, १८५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण करत असून, मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघाताने पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

error: Content is protected !!