विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :
वरणगाव येथे भटके विमुक्त समाज बांधवांची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. सदर बैठकीस भटके विमुक्त समाजाचे राज्यस्तरीय नेते रवींद्र गायकवाड व अरुण धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत भटके विमुक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांना बळकटी देणे तसेच विविध शासकीय योजना समाज बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भटके विमुक्त समाजाला शासनामार्फत व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे या प्रमुख मागण्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड, अरुण धनगर, भगवान वंजारी, रफिक भाई पठाण, राजाराम वंजारी, हरचंद भोई, परशुराम गुंमळकर, घनश्याम भुते, सतीश पर्वते, वाल्मीक जाधव तसेच महिला आघाडीच्या भारती कापसे, संध्या पवार यांच्यासह कृष्णा शिंदे, तुषार बाबर, पांडुरंग कलनोर, राजेश बाबर, आनंद शिंदे, पंकज गुंमळकर, राजेश करनोर, अनिल शिंदे, दीपक कन्नोर, आनंद माळवे, नवल शिंदे आदी भटके विमुक्त बहुजन संघाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















