Homeताज्या बातम्याविराट, शमीसह प्लेअर ऑफ टोर्नामेंटच्या शर्यतीत कोण कोण? नावं झाले जाहीर, तुम्हीही...

विराट, शमीसह प्लेअर ऑफ टोर्नामेंटच्या शर्यतीत कोण कोण? नावं झाले जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत…

विराट, शमीसह प्लेअर ऑफ टोर्नामेंटच्या शर्यतीत कोण कोण? नावं झाले जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत…

मुंबई :- यसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने येणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, एकीकडे दोन्ही संघांमध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चुरस सुरू असताना दुसरीकडे स्पर्धेतील खेळाडूंमध्ये एक वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ती चुरस आहे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान जिंकण्याची.

यंदाच्या वर्ल्डकपमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी शर्यतीत असलेल्या खेळाडूंची यादी आयसीसीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी खास वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटप्रेमींनाही त्यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू वाटणाऱ्या खेळाडूला मत देता येणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही आयसीसीने सांगितली असून आयसीसीच्या (https://www.icc-cricket.com/awards/player-of-the-tournament/) या लिंकवर जाऊन क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मत देऊ शकतात.

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, अॅडम झॅम्पा, क्विंटन डी कॉक, मोहम्मद शमी, रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि डेरेल मिचेल यांच्या नावांचा समावेश आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीमधील ८ खेळाडूंपैकी ४ खेळाडू भारताचे आहेत. त्यामुळे यावेळच्या स्पर्धावीराचा मान भारतीय क्रिकेटपटूला मिळण्याची दाट शक्यता आहे. आता स्पर्धावीराचा मान कुणाला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कोहलीने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ३ शतकं आणि ५ अर्धशतकांसह ७११ धावा कुटून काढल्या आहेत. तर रोहित शर्मानेही धडाकेबाज फलंदाजी करत ५०० हून अधिक धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन करताना २३ बळी टिपले आहेत. तर जसप्रीत बुमराहनेही जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!