Homeताज्या बातम्याइस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता....

इस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता….

 भारताचे परराष्ट्र मंत्रालय: इस्राईलच्या  इराणवरील

हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला असून भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम

आशियात तणाव वाढण्याची भीती आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळण्याच्या शक्यतेमुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीतून या संकटावर तोडगा काढावा, असे आवाहनही भारताने केले आहे

दोन्ही देशांमधील तणाव चिघळण्याची भीती व्यक्त केली जात असून, या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी वाढ झाली असून इराणकडून होर्मूज खाडी बंद केली जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईल दरम्यान वाढत्या तणावावर चिंता केली आहे. तसेच बदलत्या स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही म्हटले आहे. सोबतच, दोन्ही देशांना तणाव टाळण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीतून या संकटावर मात काढावा असे आवाहनही केले आहे. भारताचे इराण व इस्राईलशी देखील मैत्रीचे संबंध आहे. या मैत्री संबंधांचा हवाला देताना भारताने सर्वप्रकारचे सहकार्य दोन्ही देशांना देऊ केले आहे.

दरम्यान, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहात असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीयांनी तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व सुरक्षिततेबाबत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

error: Content is protected !!