Homeराजकीयराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक…

“कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान”
सध्या राज्यभर कोरोना महामारी चे संकट घोंगावत आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. आशा काळात शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन जाहिर केला होता. त्याचे परिणाम गेल्या ३-४ महिन्यांपासून अर्व्यव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योग धंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेक जणांची हालाकीची परिस्थिती झाली आहे. काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहे. राज्याच्या तिजोरीवर देखील ताण आला आहे. पालक आणि  शाळा महाविद्यालये देखील अपवाद नाहीत. शाळा महाविद्यालये,कोचिंग क्लासेस या महामारीमुळे गेली ४-५ महिने बंद आहेत. बऱ्यापैकी कामकाज कमी झाले आहे किंवा विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नाहीयेत.परिणामी शाळा महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत.
मात्र काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये अधिकचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांच्या कडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. अशावेळेस काही शाळांसोबत व विद्यालयांसोबत संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी आहेत असे जाणून आले. मात्र पालक वर्गाचे देखील बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले गेलेले आहे.
अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांच्या कडून शुल्क मागणी या बाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे.अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून येणाऱ्या काळामध्ये कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सूचित केले आहे.
यानुसार
१. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.
 २. शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे.
३. निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने  भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
४. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.
वरील शुल्कनीती सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस समजावून सांगत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या ताई शिरसाट,आ.संदिप भैय्या क्षिरसागर,आ.बाळासाहेब अजबे,मा.जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयसिंग भैय्या सोळंके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मराठवाडा विभाग प्रमुख प्रशांत कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नेताजी साळुंके, बीड जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हानकर, प्रदेश संघटक दयानंद शिंदे, अभिजित पवार, शरद वाघ, अनंत ढोपरे, गणेश थोरात, महेश तपसे हे सर्व शाळा, विद्यालय व  क्लासेस यांना प्रत्यक्ष भेट देऊन वरील कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहेत.
त्याचबरोबर या शिक्षण शुल्कनीती चा अवलंब करण्याचा आग्रह धरणार आहे व तसे  न करता विद्यार्थ्यांना वा पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नेताजी साळुंके यांनी मांडली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!