Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांकडून बँकांमध्ये सवज टिपणारी टोळी जेरबंद ; राज्यासह इतर राज्यातील 19...

पुणे पोलिसांकडून बँकांमध्ये सवज टिपणारी टोळी जेरबंद ; राज्यासह इतर राज्यातील 19 गुन्ह्यांचा उघड…

पुणे पोलिसांकडून बँकांमध्ये सवज टिपणारी टोळी जेरबंद ; राज्यासह इतर राज्यातील 19 गुन्ह्यांचा उघड…

लष्कर पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), बँकेतून पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून विश्वास संपादित करुन चलाखीने त्यांच्याकडील रोकड लुटणार्‍या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. 
दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय 47, रा. पानीपत, हरियाना), सुनिल रामप्रसाद गर्ग (वय 37, रा. पानीपत, हरियाना), सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी (वय 29, रा. हरियाना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही मुळचे हरियाणा येथील राहणारे आहेत. त्यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरे, परराज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असून, त्यांच्याकडून १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून आरोपी फसवणूक करायचे. राज्यासह परराज्यात देखील अशाप्रकारचे काही गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत 13 जून रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडला होता. फिर्यादी हे ढोले पाटील रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने बँकेतून 3 लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. त्यांनी बँकेतून पैसे काढले. रोकड बँगेत ठेवत असताना कॅश काऊंटरजवळ उभा असलेल्या एकाने त्यांना पेन्सिलने खुणा केलेल्या व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे, असे सांगितले. त्यांना तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले. ते घेऊन तो नजर चुकवून पसार झाला होता.

लष्कर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन दिपककुमार याला त्याच्या साथीदार सुनिल याच्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरजकुमार यालाही अटक करण्यात आली. या तिघांनी मिळून राज्यातील विविध शहरांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, तपास पथकाचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोर्‍हाडे, रमेश चौधर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!