Homeताज्या बातम्या29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्‍लोषात उदघाटन...

29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्‍लोषात उदघाटन…

29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्‍लोषात उदघाटन…
पुणे :- केंद्र सरकारने महिला आरक्षण बिल आणले. लोकसभेत पास झाले. आम्ही त्यास पाठिंबा दिला. मात्र  या बिलावर अंमलबजावणीची तारीख नाही. ही जुमलेबाजी आहे. हे बिलाच्या अंमलबजावणी 2029 पर्यंत होऊ शकत नाहीत. नुकतीच इंडियाची चेन्नई मध्ये मिटिंग झाली. यामध्ये  सोनिया गांधी,प्रियांका गांधी यांनी सांगितले की,  इंडियाचे सरकार सत्तेत आले तरच महिला आरक्षणबिलाची अंमलबजावणी होऊ शकते आणि केंद्रात सत्तेत आल्यावर पाहिले ते काम आम्ही करू असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
कला, संस्कृती गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी मिलाफ असणारा 29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे मोठ्या जल्‍लोषात झाले. यावेळी सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी भूषविले. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,  माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार  रवींद्र धंगेकर, माजी आमदर मोहन जोशी,  माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, माजी महापौर कमल व्यवहारे, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे मुख्य संयोजक अमित बागुल आणि विश्वस्त सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सदस्य रमेश भंडारी, नंदकुमार कोंढळकर यांच्यासह आदी उपस्थितीत होते.
विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्ती प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक व दिग्दर्शक स्वागत थोरात, लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि लावणी सम्राज्ञी रूपा व दीपा परभणीकर यांचा ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिरीष बोधनी यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, देवीची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पाच दिवस जुन्या संसद भवन वास्तूत बोलले. या वास्तूमध्ये अनेक दिगग्ज नेत्यांनी प्रश्न मांडले. ही वास्तू आम्हला सोडायची नव्हती. मात्र ही वास्तू सोडावी लागली आहे. या नवीन संसदेच्या वास्तूमध्ये अंतर निर्माण झाले आहे.
गेली 3 दिवसापासून काँग्रेसनेत्या सोबत  आहे. आमच्या बरोबर काँग्रेस, आम्ही आणि शिवसेना सुप्रीम कोर्टात लढा देत आहोत. सध्या संघर्ष सुरू आहे,  हाच संघर्ष आम्हाला यश देणार आहे.

पुण्यात कारभारी बदललेले आहेत. त्यामुळे मला खासदार म्हणून नागरिकांना  सामोरे जावे लागत आहे.  मात्र आमचे नगर सेवक नाही. महापालिका निवडणूक सर्वे चांगला येत नसल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे. लवकर महापालिकेच्या निवडणुका घ्यावात अशी विनंती यावेळी राज्य सरकारला सुळे यांनी केली.
मी आता पुण्यात लक्ष घालणार आहे  असेही यावेळी त्यांनी सांगितले. पुढील वर्षी महाविकस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असेही यावेळी त्या म्हणल्या.
उल्हास पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, पुणे नवरात्रो महोत्सव गेली सलग 29 वर्षे अविरतपणे सुरू आहे. आबा बागुल खऱ्या अर्थाने कार्यक्षम नगरसेवक म्हणून काम करीत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याने अभिमान वाटतो.
पुरस्काराला उत्तर देताना संजय मालपाणी म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी समृद्धी देणारा आहे. हा सर्व माझ्या टीमचा आहे. गणेश चंदनशिवे म्हणाले, नारी शक्ती ही फार मोठी आहे. संत जनाबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांनी माणुसकीचे विचार परले.  अस्मिता जगताप म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. माझ्या कार्याचे कौतुक झाले, यामूळे आणखी प्रेरणा मिळेल.
सनईच्या मंजुळ सुरांनी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उदघाटन झाले. प्रसंगी देवीची सामुहीक आरती करण्यात आली.
प्रस्ताविक पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले. ते म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात सातत्याने उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या सोहळ्यात दरवर्षी ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कारा’नं गौरवले जाते. याबरोबरच ख्रिसमस संध्या, हरवलेले संस्कार, काशीयात्रा असे विविध उपक्रम वर्षभर केले जाते.
उद्घाटनप्रारंभी नादरूप संस्थेच्या  नृत्यांगना शमा भाटे व सहकारी ‘ओम कालिका’ सादर केले. ‘आंबा आली ओ पाऊली’ हा देवीचा गोंधळ व जागर स्वाती धोकटे, विनोद धोकटे यांनी सादर केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त मानवंदना देणारा ‘शिवराज्याभिषेक’ हा कार्यक्रमदेखील त्यांनी सादर केला.  ‘पायलवृंद’ प्रस्तुत ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे  यांनी सादर केला. त्यामध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, सानिया चौधरी, अदिती द्रविड, ऋजुता सोमण, कार्तिकी आदमने, वैशाली जाधव, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर नृत्याविष्कार सादर  केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.
स्वीट ९० आशा’ हा मनोहारी कार्यक्रम सादर झाला. गानकोकिळा आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या अवीट गीतांचा नजराणा गीतांजली जेधे, अजय दुधवडे आणि गायक – वाद्यवृंद सादर केला. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!