Times of Maharastra Desk, १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्”. २४ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच ७५ वर्षांपूर्वी भारतीय संविधान सभेने “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती. ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर १९३७ मध्ये या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते.आणि आशा ह्या आपल्या भारताच्या राष्ट्रीय गीताला तब्बल १५० वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या निमित्ताने राज्यात ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर शाळांमध्ये गीत गायन उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाचे सचिव अ.रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्ताना या बाबाद पत्र लिहीत सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त ठाणे येथील राजमाता जिजाबई ट्रस्ट तर्फे शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते. सध्या बहुतांश शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी सुरू आहे त्यामुळे दुसऱ्या सत्राच्या सुरवातीला राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार १५० वर्ष पूर्ण होणार आहेत. राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी गायिली जातात.
मात्र, १५० वर्षपूर्तीचे औचित्याने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमां सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’ गीताचे गायन तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांमध्ये लावण्यात यावे आशा सूचना सर्व शाळांना देण्यात यावा असे देखील त्या पत्रात आयुक्ताना सांगितले आहे.






















