Homeक्राईमPune ACB Trap Case: PSI प्रमोद चिंतामणीवर 2 कोटी लाच प्रकरणाचा आरोप,...

Pune ACB Trap Case: PSI प्रमोद चिंतामणीवर 2 कोटी लाच प्रकरणाचा आरोप, CP, DCP यांना मॅनेज करू म्हणणारा PSI चिंतामणी ACBच्या सापळ्यात

Times of Maharashtra desk, Pune :पिंपरी चिंचवड पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ₹46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेने केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या कारवाईची देशपातळीवर दखल घेऊन CBIनेही तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

ही कारवाई ₹4 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या जामीन अर्जावर परिणाम करण्यासाठी मागितलेल्या लाचेच्या व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार वकील यांच्या मते, PSI प्रमोद चिंतामणी यांनी सांगितले की

“तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचं बघून घेऊ, CP आणि DCP यांना मॅनेज करू.”

या वक्तव्यानंतर तक्रारदारांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने सापळा रचून चिंतामणी यांना रंगेहात पकडले.

लाच मागणी आणि सापळा
तक्रारदाराकडून ₹2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ₹46 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी ₹1.5 लाख रुपये रोख आणि ₹45 लाखांच्या बनावट नोटा वापरून लाच रक्कम तयार करण्यात आली.
सापळा रचताना चिंतामणी यांना रस्ता पेठेतील पुना कॅफे येथे बोलावण्यात आले. मात्र त्यांनी “इथे कॅमेरे आहेत” असे सांगून ठिकाण बदलण्याची सूचना केली. तक्रारदार आणि पंच उंटाड्या मारुती मंदिरासमोर पोहोचले असता चिंतामणी यांनी रिक्षा करून त्या रिक्षात लाचेची पिशवी ठेवली. त्याच क्षणी ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
चौकशीतील महत्त्वाचे उघड
  • चौकशीत चिंतामणी यांनी पोलीस आयुक्त (CP) आणि पोलीस उपायुक्त (DCP) यांची नावे घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

  • लाच व्यवहाराची सुरुवात पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या केबिनमध्ये झाली होती.

  • सावंत यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली नसल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी त्यांनी तक्रारदार आणि चिंतामणी यांच्याशी संवाद साधला होता.

  • चिंतामणी यांनी तक्रारदाराला सांगितले होते 

    “माझ्यासाठी एक कोटी आणि साहेबांसाठी एक कोटी द्या. पण साहेबांशी हा विषय बोलू नका.”

न्यायालयीन कारवाई

गिरफ्तारीनंतर PSI प्रमोद चिंतामणी यांना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ६ नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
CBIनेही या प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे, कारण एका PSIकडून इतक्या मोठ्या प्रमाणात लाच मागणी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
ACB आणि CBI दोन्ही संस्थांनी उच्च अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याचे संकेत दिले आहेत.
या तपासातून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!