Times of Maharashtra Desk, Sheikh Hasina: बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हासिना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमां खान यांना मृत्यूदंडाची शिक्षा सूनविण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या अशांतता आणि मानवतेविरुद्धच्या ५ गंभीर गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. आता या आरोपांवर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शेख हसिना ४०० हून अधिक लोकांच्या मृत्यूसाठी दोषी
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार , शेख हसीना यांनी आंदोलकांना भडकावले, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले आणि आंदोलना वेळी झालेल्या हत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. आंदोलनाला क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.आणि हे पुराव्याने सिद्ध देखील झाले असून न्यायालयाने शेख हुसिना यांना ४०० हून अधिक लोकांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवले आहे. तसेच त्यांनी ढाका विद्यालयाच्या कुलगुरुना फोन करून धमकावले असल्याचा प्रकार ही समोर येऊन तो सिद्ध झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. आखेर आज त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नक्की गुन्हा काय?
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान यांचीवर सन 2024 साली बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता. या खटल्यामध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर करण्यात आले होते. याच प्रकरणी त्यांना त्यांचा देश देखील सोडवा लागला होता. हे आरोप शेख हसीना यांनी अमान्य केले होते. शेख हासिना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार स्थापन झालं होतं. सन 2024 च्या जुलै महिन्यात सरकारविरोधात मोठं आंदोलन करण्यात आले होते,दोन महिने चाललेल्या या आंदोलनादरम्यान 1400 नागरिकांची हत्या झाली होती तर २५००० लोक जखमी झाले होते. अशी माहिती न्यायालयातील सुनावणीच्या वेळी मुख्य अभियोक्ता ताजुल इस्लाम यांनी दिली. या प्रकरणात दोषी ठरवत आंतरराष्ट्रीय न्यायलयाने शेख हासिना यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
हा गुन्हा दाखल होताच शेख हासिना यांना देश सोडायला लागला होता. देश सोडल्यानंतर सध्या त्या भारतात राहत आहेत. त्यांच्या अनुपस्थित हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू होता. आणि अखेर या खटल्याचा निकल लागला आहे.
आंदोलनात नेमके घडले काय होते.
बांग्लादेश मध्ये बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला पुढे हिंसक रुप प्राप्त झाले . विद्यार्थ्यांच्या मते गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जात नाहीत. तर सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजूने आहे. या आंदोलनात नंतर विरोधी पक्ष देखील सामील झाला. देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने जमाव गोळा केला यामुळे आंदोलनच आणखीनच चिघळले. यावेळी विरोधी पक्षाने हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामध्ये सरकार विरोधी पक्षाला थांबवू शकले नाही. लष्कराने देखील सरकारला साथ देण्यास नकार दिला होता. या आंदोलनात अनेक लोकानी आपले प्राण गमावले होते.
शेख हसीना आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच हा गुन्हा घडला
या प्रकरणात माजी गृहमंत्री असदुज्जमां खान यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायलायच्या म्हणण्यानुसार यात माजी गृहमंत्री असदुज्जमां खान यांचा देखील हात होता. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायलयात 54 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. देशभरातून मिळालेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या अतिरिक्त पुराव्यांचीही तपासणी देखील यवेळी करण्यात आली.तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करुन हा निकल सुनावण्यात आला आहे.
आयसीटी न्यायालय काय म्हणाले?
शेख हसीना यांनी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना मारण्याचे आदेश दिले होते. ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत झालेल्या फोन संभाषणात हसीना यांनी हिंसक कारवाईचे निर्देश दिले आणि विद्यार्थ्यांचा अपमान केला, ज्यामुळे निदर्शने आणखी भडकली, हसीना यांचे वक्तव्य अपमानजनक आणि हिंसा भडकावणारे होते. त्यांनी जाणूनबुजून आपल्या आदेशांद्वारे लोकांचा जीव घेण्याचे षडयंत्र रचले. कोर्टाकडे हसीना आणि विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डही उपलब्ध आहेत ज्यात ही सिद्ध होते की शेख हासिना यांनी हिंसाचार वाढवण्यासाठी ही मुद्दाम केले आहे. असे आयसीटी न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांनी सुनावणीच्या वेळी नमूद केले आहे.






















