Times of Maharashtra Desk, G20 Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या G20 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत . शिखर परिषदेदरम्यान त्यांनी जागतिक विकास मॉडेल्सवर भाषण दिले. त्यावेळी त्यांनी जागतिक विकासाच्या आदर्शांचा सखोल पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे . भाषणात ते G20 ने जागतिक वित्त आणि विकासाला चालना दिली आहे असे म्हणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २१ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचले असून २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान G20 शिखर परिषदेत आयोजित केली आहे. या परिषदेच्या सुरवातीलाच पंतप्रधान मोदींनी “समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, सर्वांना एकत्र घेऊन जाणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले.
यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. – नरेंद्र मोदी
G20 शिखर परिषदेतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की “गेल्या अनेक दशकांमध्ये, जी-२० ने जागतिक वित्त आणि जागतिक आर्थिक विकासाला आकार दिला आहे. तथापि, स्थापित केलेल्या विकासाच्या मापदंडांमुळे मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून वंचित ठेवले आहे. शिवाय, त्यांनी निसर्गाच्या अतिरेकी शोषणाला देखील प्रोत्साहन दिले आहे. आफ्रिका याचा एक मोठा बळी आहे. आज, आफ्रिका प्रथमच जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करत असल्याने, आपण विकासाच्या मापदंडांवर पुनर्विचार केला पाहिजे.”ते म्हणाले, “यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. याचा अर्थ असा की आपण मानवता, समाज आणि निसर्गाला एकात्मिक समग्र म्हणून पाहिले पाहिजे. तरच प्रगती आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद शक्य होईल.”

अनेक समुदायांनी त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीचे जतन केले आहे – पंतप्रधान मोदी
“जगभरात असे अनेक समुदाय आहेत ज्यांनी त्यांच्या पारंपारिक आणि पर्यावरणीय संतुलित जीवनशैलीचे जतन केले आहे. या परंपरा केवळ शाश्वतताच दर्शवत नाहीत तर सांस्कृतिक ज्ञान, सामाजिक एकता आणि निसर्गाबद्दलचा खोल आदर देखील दर्शवतात.”ते म्हणाले, “भारत G20 अंतर्गत जागतिक पारंपारिक ज्ञान भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवतो. भारताचा भारतीय ज्ञान प्रणाली उपक्रम त्याचा पाया म्हणून काम करू शकतो. हे जागतिक व्यासपीठ मानवतेचे सामूहिक ज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी सभेला संबोधित केले आहे.



















