Homeताज्या बातम्याG20 Narendra Modi“G20 शिखर परिषदेत मोदींचा आह्वान: विकासाचे नविन आदर्श आणि एकात्मिक...

G20 Narendra Modi“G20 शिखर परिषदेत मोदींचा आह्वान: विकासाचे नविन आदर्श आणि एकात्मिक मानवतावाद”

Times of Maharashtra Desk, G20 Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या G20 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत . शिखर परिषदेदरम्यान त्यांनी जागतिक विकास मॉडेल्सवर भाषण दिले. त्यावेळी त्यांनी जागतिक विकासाच्या आदर्शांचा सखोल पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे . भाषणात ते G20 ने जागतिक वित्त आणि विकासाला चालना दिली आहे असे म्हणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २१ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचले असून २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान G20 शिखर परिषदेत आयोजित केली आहे. या परिषदेच्या सुरवातीलाच पंतप्रधान मोदींनी “समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, सर्वांना एकत्र घेऊन जाणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले.

यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. – नरेंद्र मोदी

G20 शिखर परिषदेतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की “गेल्या अनेक दशकांमध्ये, जी-२० ने जागतिक वित्त आणि जागतिक आर्थिक विकासाला आकार दिला आहे. तथापि, स्थापित केलेल्या विकासाच्या मापदंडांमुळे मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून वंचित ठेवले आहे. शिवाय, त्यांनी निसर्गाच्या अतिरेकी शोषणाला देखील प्रोत्साहन दिले आहे. आफ्रिका याचा एक मोठा बळी आहे. आज, आफ्रिका प्रथमच जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करत असल्याने, आपण विकासाच्या मापदंडांवर पुनर्विचार केला पाहिजे.”ते म्हणाले, “यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. याचा अर्थ असा की आपण मानवता, समाज आणि निसर्गाला एकात्मिक समग्र म्हणून पाहिले पाहिजे. तरच प्रगती आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद शक्य होईल.”

अनेक समुदायांनी त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीचे जतन केले आहे – पंतप्रधान मोदी

“जगभरात असे अनेक समुदाय आहेत ज्यांनी त्यांच्या पारंपारिक आणि पर्यावरणीय संतुलित जीवनशैलीचे जतन केले आहे. या परंपरा केवळ शाश्वतताच दर्शवत नाहीत तर सांस्कृतिक ज्ञान, सामाजिक एकता आणि निसर्गाबद्दलचा खोल आदर देखील दर्शवतात.”ते म्हणाले, “भारत G20 अंतर्गत जागतिक पारंपारिक ज्ञान भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवतो. भारताचा भारतीय ज्ञान प्रणाली उपक्रम त्याचा पाया म्हणून काम करू शकतो. हे जागतिक व्यासपीठ मानवतेचे सामूहिक ज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी सभेला संबोधित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!