Homeक्राईमPune Police Action: मध्य प्रदेशात पुणे पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्रनिर्मिती करणारी...

Pune Police Action: मध्य प्रदेशात पुणे पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्रनिर्मिती करणारी ४७ जणांची टोळी जेरबंद

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक अल्पवयीन गुन्हेगारांकडे शस्त्र उपलब्ध झाल्याने शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांना या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत असल्याचे धागेदोरो पुणे पोलिसांच्या हाती लागले होते. या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात धडक कारवाई करत अवैध शस्त्र बनवणाऱ्या एक टोळीला जेरबंद केले आहे.

पुणे शहर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत पोलिसांनी ४७ जणांना जेरबंद केले आहे. पुणे पोलिसांच्या एकूण १०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुत्रांमार्फत मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील उर्मती परिसरामध्ये एकाच वेळी ही छापेमारी केली.

या छापेमारीत पिस्तूल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार स्वतंत्र फॅक्टऱ्या आढळून आल्या. या युनिट्समध्ये शस्त्रांची बेकायदेशीर निर्मिती, दुरुस्ती आणि पुरवठा सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा उध्वस्त करत कारखान्यांमध्ये आढळलेले सर्व साहित्य सील केले. कारवाईत १०० पेक्षा अधिक बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्राइंडिंग मशीन, २ पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय इतर महत्त्वाचे साचे, औजारे आणि उपकरणेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!