Homeताज्या बातम्या"भाजप-शिवसेना तणावात लाडक्या बहिणींचा कौल कुणाकडे वळणार?" एकनाथ शिंदेच मोठ विधान

“भाजप-शिवसेना तणावात लाडक्या बहिणींचा कौल कुणाकडे वळणार?” एकनाथ शिंदेच मोठ विधान

Times of Maharashtra Desk: राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीत अनबन दिसत आहे. अशातच लाडक्या बहिणी नक्की कोणाला मत देणार असा प्रश्न उठवला जात आहे. गेल्यावर्षी लाडक्या बहिणीनी मत देत महायुतीला सत्तेत आणल होत. आता पालिका निवडणुकीत महायुतीत असलेल्या मतभेदांमुळे महायुतीतील सर्व पक्ष स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवत आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणी राजकीय आखाड्यात ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत. काही ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी कोणाला मत देणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण याचे उत्तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली होती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जेथे भाजप व शिवसेना एकमेकाच्या विरोधात लढत आहे, तेथे लाडक्या बहिणींनी कोणाला मतदान करायचे? या पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाले, महायुती सरकारने सुरू केलेल्या आमच्या टीमने सुरू केली होती, मी मुख्यमंत्री होतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, टीम म्हणून आम्ही ती योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना किती अडथळे आले ते देखील माहित आहे, परंतु आम्ही एकदा निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू आणि अंमलबजावणी करण्याची, कोणी कितीही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी विदर्भात कालपासून प्रचार करतो आहे, प्रचार सभांना उपस्थित राहिलो, प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये दिसून येत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सभेमध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थिती होती, यावरून शिवसेनेचे जिथे जिथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवर जनता उभे राहिल्याचे चित्र पाहिले आहे आणि विकासाचा मुद्दा आमचा आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील जिथे आमचा नगराध्यक्ष नव्हता तिथेही आम्ही विकासाला पैसे दिले आहेत, म्हणून विकासाच्या मुद्द्यावर, पाणी, गटार, मैदान, उद्यान,आरोग्य व्यवस्था या सगळ्यांसाठी आम्ही पैसे दिले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हा विश्वास आहे की लाडक्या बहिणी त्यांच्यापाठी उभ्या राहतील परतू आता खरंच लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेंच्या पंथी उभ्या राहणार का ही निकालाच्या दिवशीच समजणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!