Homeक्राईमPune Crime: पुण्यातील आयटी इंजिनिअरची १४ कोटींची फसवणूक: आरोपी वेदिका पंढरपुरकर पैसे...

Pune Crime: पुण्यातील आयटी इंजिनिअरची १४ कोटींची फसवणूक: आरोपी वेदिका पंढरपुरकर पैसे परत देण्यास तयार

Times of Maharashtra Desk: पुण्यातील आयटी इंजिनिअर दीपक डोळस यांची तब्बल १४ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. फसवणुकीतील मुख्य आरोपी वेदिका पंढरपुरकरने डोळस यांचे लुबाडलेले सर्व पैसे परत देण्याची तयारी दाखवली असून, याबाबतचे प्रतिज्ञापत्र आज न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

एबीपी माझाने प्रथम ही फसवणूक उघडकीस आणली होती. तपासात उघड झाले की वेदिका पंढरपुरकर, तिचा पती कुणाल पंढरपुरकर आणि गुरु दीपक खडके यांनी मिळून दीपक डोळस आणि त्यांच्या शिक्षिका पत्नीला ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा बहाणा करून आर्थिक जाळ्यात ओढले. त्यांच्या दोन मुलींचे दुर्धर आजार बरे होतील, अशी खोटी हमी देत डोळस यांची सुमारे पाच वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने फसवणूक करण्यात आली.

२०१८ पासून सुरू असलेल्या या कारवायांमध्ये वेदिकाने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ येतात अशी नाटकं करून डोळस दांपत्यावर मानसिक दबाव टाकला. संपत्ती ठेवली तर संकटे येतील, असा खोटा धाक दाखवत त्यांना त्यांच्या आयुष्यभराची कमाई विकायला भाग पाडले.

डोळस यांनी पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील घर, फार्महाऊस, प्लॉट आणि फ्लॅट देखील विकून मिळालेली रक्कम आरटीजीएसद्वारे वेदिका आणि दीपक खडके यांच्या खात्यांवर वळती केली. त्यानंतरही मुलींच्या आरोग्यात सुधारणा न झाल्याने शंका घेत चौकशी केली असता त्यांना घरातील ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी मालमत्ता विकण्याचे दडपण टाकण्यात आले.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी वेदिका पंढरपुरकर, कुणाल पंढरपुरकर आणि दीपक खडके यांना अटक केली होती. न्यायालयानेही आरोपींचे जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळले होते.

ताज्या घडामोडीत, वेदिका पंढरपुरकरने संपूर्ण १४ कोटी रुपयांची परतफेड करण्याची तयारी दर्शवली असून, तिच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर होणार आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!