Times of Maharashtra Desk: नवले पुलावर अपघाताच्या घटना सतत सुरु आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या सलग दोन अपघातानंतर आज ८ डिसेंबर रोजी नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना समोर अली आहे. नावाने पुलावरील ब्लॅक स्पॉट या ठिकाणी एका शाळेच्या बसने एका कारला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
नवले पुलावर सकाळी एका शाळेच्या बसने समोर जात असलेल्या कारला मागून धडकले असून या अपघातात कार मधील दोन्ही व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मागून धडक बसल्यामुळे या कारचा मागचा भाग पूर्णपाने चक्कचूर झाला असून बस मध्ये विध्यार्थी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमींना लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात जरी किरकोळ असला तरी नवले पुलावर होणाऱ्या सततच्या अपघातानंतर यावर कायमचा उपाय करण्याची मागणी नागरिकांकाढून केली जात आहे.
नवले पुनानावर अपघातांचा पाढा चालूच…
काही दिवसांपूर्वी १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात ८ जणांचा बाली गेला होता. त्यानंतर त्याच्या चार दिवसांनी लगेच एका पाठीपात एका अश्या जवळजवळ पाच ते सहा गाड्यां एकमेकांवर आढळल्या होत्या. या भीषण अपघातात देखील मोठे नुकसान झाले होते. नव्या कात्रज बोगद्याकडून पुलाकडे येताना असलेला तीव्र उतार हे अपघातांचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते. यावर आता लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या या मार्गाचा उतार सुमारे 4.3 टक्के असून, त्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.






















