Homeताज्या बातम्याPMC Election: सुशिक्षित नेतृत्व की अपयशी कारभार? मतदार ठरवणार निकाल; बालाजीनगर, कात्रज,...

PMC Election: सुशिक्षित नेतृत्व की अपयशी कारभार? मतदार ठरवणार निकाल; बालाजीनगर, कात्रज, आंबेगावमध्ये अस्मिता रानभरेंची प्रचारात आघाडी

Times of maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ (अ) – बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरात निवडणुकीची लढत चांगलीच रंगली आहे. या प्रभागात मतदारांसमोर दोन वेगवेगळ्या विचारधारा आणि कार्यशैलींचा थेट सामना पाहायला मिळत आहे.

एकीकडे माजी नगरसेविका स्मिता कोंढे असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत अपेक्षित कामे झाली नसल्याची नाराजी मतदारांमध्ये दिसून येत आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवार सौ. अस्मिता भूषण रानभरे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या अस्मिता रानभरे या संविधानिक मूल्ये, पारदर्शक कारभार आणि विकासवादी विचारधारेच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक विकास, महिला सशक्तीकरण, युवकांसाठी संधी, तसेच मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून येत असल्याचीही चर्चा आहे. ‘सेवेसाठी राजकारण’ ही भूमिका घेत त्या मतदारांशी संवाद साधत आहेत.

या प्रभागातील लढत केवळ उमेदवारांची नसून जुना विश्वासघात विरुद्ध नवी ऊर्जा आणि अपेक्षाभंग विरुद्ध विश्वासाचा नवा संकल्प अशीच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मागील काही दिवसांपासून बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण, तरुणांमधील नशेखोरी वाढल्याने या प्रभागातील नागरिक येत्या निवडणुकीत सुशिक्षित अस्मिता भूषण रानभरेंच्या बाजूने कौल देतात का? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!