Homeताज्या बातम्यापुण्यातील कर्वेनगरमध्ये नळातून आले मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनावर संताप

पुण्यातील कर्वेनगरमध्ये नळातून आले मैलामिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनावर संताप

Times of Maharashtra Desk : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील गायकवाड चाळ भागात रविवारी (ता. १८) नळाला चक्क मैलामिश्रित पाणी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी कर्वेनगर येथील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात रविवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असता, अनेक घरांमधील नळांना काळसर आणि अत्यंत घाण वास येणारे पाणी आले. हे पाणी इतके दूषित होते की त्यात मैल्याचे अंश स्पष्टपणे दिसून येत होते. पिण्यासाठी आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोगराईचा धोका आणि आंदोलनाचा इशारा दूषित पाण्यामुळे परिसरात जुलाब, उलटी, ताप आणि त्वचारोगासारखे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.”महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन नवीन जलवाहिनी टाकावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

तात्पुरती उपाययोजना आणि दुरुस्ती या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका रेश्मा बराटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे जार उपलब्ध करून दिले आहेत. महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया याबाबत माहिती देताना पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई म्हणाल्या, “नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही जलवाहिनीची पाहणी केली आहे. या भागात ड्रेनेज लाइनच्या चेंबरमधून काही नळजोड गेले असून, ते जुने झाल्याने गंजले होते. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित नळजोड बंद करण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.”

आज सोमवारी (दि. १९) सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर गळतीची नेमकी जागा शोधून पुढील कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!