Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद रणधुमाळी सुरू; राष्ट्रवादीला मोठा धक्का, सोनटक्के ठाकरे गटाच्या वाटेवर?

जिल्हा परिषद रणधुमाळी सुरू; राष्ट्रवादीला मोठा धक्का, सोनटक्के ठाकरे गटाच्या वाटेवर?

परभणी प्रतिनिधी – प्रवीण चौधरी 

Times of Maharashtra : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट)  परभणीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी रविवारी (दि. १९) आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर केला आहे.

दरम्यान, प्रा. सोनटक्के हे लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता असून जांब सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या २१ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या प्रा. सोनटक्के यांनी शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महानगर जिल्हाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.

राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना प्रा. सोनटक्के यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाने घेतलेली भूमिका ही पक्षाच्या मूळ विचारधारेशी विसंगत वाटली, तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आपण अस्वस्थ झाल्याने हा निर्णय घेतला आहे.

प्रा. सोनटक्के यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली असून, येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!