Homeताज्या बातम्यानाशिक महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव, ‘कुबड्या’ वक्तव्याने वाद पेटला

नाशिक महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव, ‘कुबड्या’ वक्तव्याने वाद पेटला

Times Of Maharashtra : नाशिक महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाजपला कुबड्यांची गरज नाही या वक्तव्यामुळे शिंदे गटातील शिवसेना आक्रमक झाली असून, या वादाची दखल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या उद्देशाने भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव महायुतीतील सलोखा राखण्यासाठी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याच प्रस्तावावर मंत्री गिरीश महाजन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले.

या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडूनच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव आला आणि आता तेच नकार देत आहेत. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपचे शहराध्यक्ष स्वतः आमच्या कार्यालयात आले होते आणि त्यांनीच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आता गिरीश महाजन ‘कुबड्या नको’ असा शब्दप्रयोग करतात, हे अनाकलनीय आणि अत्यंत चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

बोरस्ते यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार असून, ते जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल. शिंदे साहेबांनी विरोधी बाकावर बसण्याचा आदेश दिला, तर शिवसेना सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यामुळे नाशिक महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील हा तणाव पुढे कोणते वळण घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!