Homeमहाराष्ट्र30 वर्षांचं पाटबंधारे सर्कल कार्यालय , तीन जिल्ह्यांचा कारभार परळीतून हलवणार?

30 वर्षांचं पाटबंधारे सर्कल कार्यालय , तीन जिल्ह्यांचा कारभार परळीतून हलवणार?

Times Of Maharashtra : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेले बीड पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल कार्यालय परभणी येथे स्थलांतरित होण्याची शक्यता बळावली असून, यामुळे परळीतील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे कार्यालय तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून परळीत आणण्यात आले होते. मात्र आता प्रशासकीय पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप होत आहे.

या सर्कल कार्यालयाअंतर्गत बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पाटबंधारे प्रकल्पांचा कारभार चालतो. भौगोलिकदृष्ट्या परळी हे तिन्ही जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेतकरी, अधिकारी व प्रशासनासाठी हे कार्यालय परळीत असणे सोयीचे होते. असे असतानाही कार्यालय परभणीला हलवण्याचा निर्णय घेतला जात असल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यापूर्वी परळीतील ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे, तर महावितरणचे परिमंडळ कार्यालय लातूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पाटबंधारे विभागाचे सर्कल कार्यालयही हलवले जात असल्याने परळी हळूहळू प्रशासकीय केंद्र म्हणून दुर्लक्षित होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी हे कार्यालय परळीतच ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तरीही स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. पाटबंधारे सर्कल कार्यालय परळीतून हलवू नये, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!