Homeउद्योगसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फटका.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना फटका.

Times Of Maharashtra Desk : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने व चांदीवरील आयात शुल्क किंवा जीएसटी कमी होईल, अशी अपेक्षा ग्राहकांपासून सराफांपर्यंत सर्वांनाच होती. मात्र, अर्थसंकल्पात सोने-चांदीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने दरांवर थेट परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.

अर्थसंकल्पात कोणताही निर्णय न घेतला गेल्यामुळे सोने आणि चांदीचे दर सध्याच्या पातळीवरच कायम राहतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

 मध्यमवर्गी माणूस सुखावला-गुंतवणुकदारांचा अपेक्षाभंग 

गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने-चांदीवरील करांबाबत कोणतीही नवी तरतूद नसल्याने दरांवर त्याचा थेट परिणाम झाला नसला, तरी जागतिक बाजारातील दबावामुळे घसरण सुरूच आहे.
काल जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६० हजार रुपये प्रति तोळा होता. मात्र, आज तब्बल ५ हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, ३० हजार रुपयांनी घट होऊन चांदीचे दर २ लाख ७० हजार रुपयांच्या खाली आले आहेत.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा दर २ लाख ६५ हजार ६०० रुपये इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीने ४ लाख २० हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, ज्या वेगाने दर वाढले होते, त्याच वेगाने ते खाली आले असून, चांदीचे दर जवळपास १ लाख ३४ हजार रुपयांनी घसरले आहेत.

केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने बाजारात निराशा आहे. गेल्या काही दिवसांत दर वाढत असल्याने गुंतवणूकदारांकडून गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात होती. मात्र, आज ईटीएफमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे.दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने सामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी बाजारातील अस्थिरता कायम असल्याने पुढील काळात दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!