Homeक्राईमचेंबूरमध्ये मराठी तरुणाचा अपमान; कार्यालयात जातीवाचक शिवीगाळ, रहेजा होम्सचा मालक अडचणीत

चेंबूरमध्ये मराठी तरुणाचा अपमान; कार्यालयात जातीवाचक शिवीगाळ, रहेजा होम्सचा मालक अडचणीत

मुंबईत मराठी–अमराठी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चेंबूरमधील एका घटनेमुळे वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्याविरोधात एका मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवरील रहेजा होम्स कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयात बैठक सुरू असताना तक्रारदाराला काही कागदपत्रे जोडून स्टॅपल करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, स्टॅपल नीट न लागल्याच्या कारणावरून सुशील रहेजाने तक्रारदारावर राग व्यक्त करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, यावेळी सुशील रहेजाने “तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं” असे म्हणत त्याला मारहाण केली. तसेच तक्रारदार हा एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला कार्यालयात अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि नोकरीवर राहू नये, असे वर्तन केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर तक्रारदाराने थेट गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेत सुशील रहेजाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गोवंडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५ अंतर्गत तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणानंतर मुंबईत पुन्हा एकदा मराठी–अमराठी वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सुशील रहेजाविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

error: Content is protected !!