Homeताज्या बातम्याशेतकरी रस्त्यांना गती! बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा आ. राजूभाऊ तोडसामांकडून आढावा

शेतकरी रस्त्यांना गती! बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा आ. राजूभाऊ तोडसामांकडून आढावा

 देवा आत्राम मारेगाव प्रतिनिधी : यवतमाळ–पांढरकवडा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रिय आमदार मा. श्री. राजूभाऊ तोडसाम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी मा. अमित रंजन तसेच तहसीलदार मा. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण तसेच नवीन रस्ते कामांना मंजुरी देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज पोहोचता यावे, वाहतूक सुरळीत व्हावी आणि पावसाळ्यातही रस्त्यांची अवस्था चांगली राहावी, यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योजनांची अंमलबजावणी करताना कोणतीही दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या. जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळणार असून शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जनतेच्या समस्या जाणून घेऊन विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले नेतृत्व म्हणून आमदार राजूभाऊ तोडसाम यांची भूमिका यावेळी अधोरेखित झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!