Homeताज्या बातम्यानिसर्ग मित्र समिती तर्फे शिवजयंतीनिमित्त जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद

निसर्ग मित्र समिती तर्फे शिवजयंतीनिमित्त जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या निसर्ग मित्र समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती ही परिषद आयोजित करत असून या परिषदेत सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, वैद्यकीय, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत तसेच विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार आहे.

या परिषदेमध्ये पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव येथे महाराष्ट्र भूषण सन्मान २०२६ प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील पाच आदर्श व्यक्तींना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या वेळी पर्यावरण परिषद महाराष्ट्र भूषण – विशेषांक २०२६ प्रकाशित करण्यात येणार असून, सदर विशेषांकासाठी आपल्या परिसरातील आदर्श व्यक्तींचे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन निसर्ग मित्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या परिषदेसाठी आमदार, खासदार, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्याध्यक्ष डी. आर. बापू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला चालना देणारी ही परिषद जळगावसाठी अभिमानास्पद ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!