Homeताज्या बातम्याआनंद मोरे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी, लग्नाआधी मतदान! पानगावच्या नवरदेवाची कृती चर्चेत

आनंद मोरे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी, लग्नाआधी मतदान! पानगावच्या नवरदेवाची कृती चर्चेत

Times Of Maharashtra Desk : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी 7 वाजल्यापासून मतदार केंद्रांवर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत असून, एकूण 7,438 उमेदवार रिंगणात आहेत. आज तब्बल 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्याच्या विविध भागांमध्ये ग्रामीण मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांकडे धाव घेतल्याचं चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि काही सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथील एका नवरदेवाने लग्नाआधी मतदान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आनंद जयराम मोरे या नवरदेवाने घोड्यावरून निघालेली वरात थेट मतदान केंद्रात नेली आणि मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कृतीमुळे मतदार जागृतीचा संदेश दिला गेल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, आनंद मोरे हे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून कार्यरत असून, विवाहासाठी गावी आले होते. बोहल्यावर चढण्याआधी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला.

या निवडणुकांसाठी सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे मतदानाची तारीख बदलून आज, 7 फेब्रुवारी करण्यात आली. मतदान प्रक्रिया आज संध्याकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार असून, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांमधून ग्रामीण भागातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!