Homeताज्या बातम्याबोरीवली-दहिसरमध्ये फेरीवाला कारवाईवर मनसेचा आक्षेप; ‘फक्त मराठी व्यापाऱ्यांनाच लक्ष्य, परप्रांतियांना संरक्षण’ असा...

बोरीवली-दहिसरमध्ये फेरीवाला कारवाईवर मनसेचा आक्षेप; ‘फक्त मराठी व्यापाऱ्यांनाच लक्ष्य, परप्रांतियांना संरक्षण’ असा आरोप

Times Of Maharashtra Desk : बोरीवली–दहिसर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाई करताना केवळ मराठी व्यापारी आणि फेरीवाल्यांनाच लक्ष्य केलं जात असून, इतर परप्रांतिय फेरीवाल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या कथित भेदभावाविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आर – मध्य प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला.

मनसेच्या वतीने आर-मध्य प्रभागातील सहाय्यक अभियंता कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रशासनाला निवेदन देत अतिक्रमणविरोधी कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. फक्त मराठी व्यापाऱ्यांवरच कारवाई केली जात असून, परप्रांतिय व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला.

कारवाई करताना नियम सर्वांसाठी समान असावेत – मनसे
या आंदोलनावेळी मनसे नेते कुणाल माईनकर आणि उपविभाग प्रमुख किरण नकाशे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. कारवाई करताना नियम सर्वांसाठी समान असावेत, कोणताही दुजाभाव चालणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी केली. अतिक्रमण हटवायचं असेल, तर ते सर्व फेरीवाल्यांवर एकसारखं झालं पाहिजे. फक्त मराठी व्यापाऱ्यांना लक्ष्य करणं अन्यायकारक असून ते आम्ही खपवून घेणार नाही, असं मनसे नेत्यांनी सांगितलं.

मनसेकडून अमराठी व परप्रांतिय फेरीवाल्यांवरही तात्काळ आणि समान कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा थेट इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

प्रशासनाकडून दखल घेण्याचं आश्वासन
मनसेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जाईल आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात समान कारवाई होत नाही तोपर्यंत मनसेची भूमिका आक्रमकच राहील, असंही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या प्रकारामुळे बोरीवली–दहिसर परिसरातील फेरीवाला कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!