Homeताज्या बातम्यामुंबई मनपा निवडणूक: सत्ता भाजपकडे, विरोधात ठाकरे गट, भाजपकडून रितू तावडे यांची...

मुंबई मनपा निवडणूक: सत्ता भाजपकडे, विरोधात ठाकरे गट, भाजपकडून रितू तावडे यांची उमेदवारी अधिकृत

Times Of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, भाजपनं महापौरपदासाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही कोणताही अपशकून करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना ठाकरे गटानं घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं की, आम्हाला आकड्यांची गणित मान्य आहेत आणि त्या वास्तवाला स्वीकारूनच आम्ही पुढची भूमिका ठरवली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना ठाकरे गट सक्षम विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. कुठल्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता, विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे आणि ठामपणे निभावली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात सक्षमपणे मांडेल आणि मुंबईकरांच्या मुद्द्यांसाठी आवाज उठवेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

विरोधी पक्षाची भूमिका आमच्यासाठी नवीन नाही
विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्याबाबत बोलताना पेडणेकर यांनी स्पष्ट केलं की, ही भूमिका शिवसेना ठाकरे गटासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेक वेळा आम्हाला विरोधी पक्षासारखीच भूमिका घ्यावी लागली होती, आणि आता तर आम्ही अधिक जबाबदारीने तीच भूमिका बजावणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. केवळ एखाद्या व्यक्तीपुरती नव्हे, तर संपूर्ण पक्ष एकसंधपणे आणि शिस्तबद्ध काम करेल, यावर त्यांनी भर दिला.

भाजपकडून रितू तावडे यांची महापौरपदासाठी अधिकृत घोषणा
दरम्यान, भाजपकडून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची चर्चा सुरू होती, मात्र अखेर रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. यंदा मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.

उपमहापौरपद शिंदे गटाकडे
मुंबई मनपामध्ये उपमहापौरपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असून, संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं की, संजय घाडी पुढील सव्वा वर्षे उपमहापौर म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

मी स्वतःला मुंबईची सेवक मानते -रितू तावडे
नावाची घोषणा होताच रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, महापौरपद ही जबाबदारी असून मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. सभागृहाची गरिमा जपत, पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांनी एकत्र येत मुंबईच्या हितासाठी निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं, हीच माझी अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

मुंबई महानगरपालिकेची महापौर निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होणार असून, रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची आणि तीव्र चर्चांची सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!