Homeताज्या बातम्याऐन मतदानादिवशी पैशांचे वाटप? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा कथित ऑडिओ व्हायरल,...

ऐन मतदानादिवशी पैशांचे वाटप? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा कथित ऑडिओ व्हायरल, जिल्ह्यात राजकीय खळबळ

Times Of Maharashtra Desk : जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा असल्याचा दावा करण्यात येणारा एक कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, या ऑडिओमुळे ऐन मतदानादिवशी मतदारांवर पैशांच्या माध्यमातून प्रभाव टाकण्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये कोटभर, दोन कोटी खर्च करायला हरकत नाही अशा स्वरूपाची वक्तव्ये ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे पैशांबाबतची चर्चा थेट व्हॉट्सॲपवरच करण्याचे निर्देश कार्यकर्त्याला दिल्याचे या संभाषणात ऐकू येते. “पैशावर किती मतदार घेता येतील, हिंगणगावमध्ये किती शक्यता आहे, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका, अशा शब्दांत सूचनांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुस्लिम व दलित वस्त्यांवर विशेष लक्ष?
या कथित ऑडिओमध्ये केवळ भाषणांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष ‘काम’ दाखवण्यावर भर देण्याचे निर्देश दिल्याचेही ऐकू येते. मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून तातडीने काम सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. दोन घेऊ, तीन घेऊ, कोणी चार घेऊ, अशा शब्दप्रयोगातून मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे या संभाषणातून सूचित होत असल्याचा दावा केला जात आहे.

चार गावांमध्ये कोणतीही तडजोड नाही
शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही कॉम्प्रमाईज करायचा नाही, असे स्पष्ट निर्देश दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये नमूद असल्याचा आरोप आहे. ५० लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत, अशा शब्दांत खर्चाच्या मर्यादेची कोणतीही अडचण नसल्याचे कथित विधान या ऑडिओत ऐकू येते.

संपूर्ण नियंत्रण स्वतःकडे?
सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही केला जात आहे. कोणाशीही चर्चा न करता, एक शब्दही बाहेर न जाता सर्व माहिती फक्त व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे आदेश दिल्याचे या संभाषणात ऐकू येते.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर या ऑडिओबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, या ऑडिओची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसून, निवडणूक यंत्रणा याकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार ) : दि. ३ जून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या उद्या, दि. ४ जून रोजी साजऱ्या...

error: Content is protected !!