Homeताज्या बातम्याअहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी तालुक्याच्या वतीने सत्कार

Times Of  Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कोकिसपीर व अहिल्यानगर परिसरातील तांड्यांना ‘महसुली गाव’ आणि त्यानंतर ‘स्वतंत्र ग्रामपंचायती’चा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजने’चे राज्य समन्वयक महंत जितेंद्र महाराज यांनी भूषवले.

१९९५ पासूनचा अविरत संघर्ष

या यशामागे तीन दशकांचा मोठा संघर्ष आहे. १९९५ मध्ये माणिकदौंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाले, तेव्हा अनेक वाड्या स्वतंत्र झाल्या, मात्र कोकिसपीर, वाघेवाडी, वंजारवाडी या वाड्या मूळ गावालाच जोडून राहिल्या. याच काळात विष्णुपंत पवार यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. सरपंचपद हुकले आणि विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली, तरी पद नसले तरी काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले. ऊसतोडणीसाठी भटकंती करणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा दिला , कोकिसपिर तांडा येथे सर्वप्रथम मतदान केंद्र आणि स्वस्त धान्य दुकान मंजूर करून घेतले. बालखंडी बाबा यात्रेतील पशुहत्या थांबवणे असो वा मंदिराचे पावित्र्य राखणे, त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे त्यांची पहिली निवडणूक बिनविरोध झाली होती.

विकासाची गंगा आणि प्रशासकीय लढा केवळ राजकीय लढा न देता त्यांनी तांड्यावर विकासाची गंगा आणली. खासदार सूर्यभान पाटील, वाहाडणे पाटील आणि आमदार धोंडीराम राठोड यांच्या सहकार्याने त्यांनी वसंतराव नाईक सभागृह, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि रस्ते काँक्रिटीकरण अशी अनेक कामे मार्गी लावली.

मात्र, खरा लढा होता तो तांड्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा! २०१२ पासून सुरू झालेला प्रशासकीय पाठपुरावा आणि ८ वर्षांच्या संघर्षानंतर, आमदार मोनिका राजळे यांच्या सहकार्याने २०१९-२० मध्ये तांड्याला ‘महसुली गावा’चा दर्जा मिळाला.

अखेर स्वप्नपूर्ती:

९ तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत महसुली गाव झाल्यानंतरही ‘ग्राम कोड’ आणि ‘आकार बंद’ या तांत्रिक अडचणी होत्याच. २०२४ मध्ये राज्य शासनाने ‘संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना’ जाहीर केली आणि या समितीवर विष्णुपंत पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली. मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि महंत जितेंद्र महाराज यांच्या पाठिंब्यामुळे २०२५ च्या अखेरीस कोकिसपीर तांड्यासह सेवानगर (तोंडोळी), हनुमान नगर (साकेगाव), वाघदारा, आंबेवाडी, वसंतराव नाईक तांडा (कळसपिंपरी) अशा एकूण नऊ तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!