Homeताज्या बातम्याअजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; बारामती क्रीडा संकुलाला ७५ कोटी, MIDC...

अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; बारामती क्रीडा संकुलाला ७५ कोटी, MIDC साठी १००० एकर जागेला मंजुरी

Times Of Maharashtra Desk : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज १० फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. बैठकीच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत त्यांचे स्वागत केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. श्रद्धांजलीनंतर मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

या बैठकीत अजित पवार यांनी निधनापूर्वी सुचवलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. बारामती येथील क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. तसेच वालचंदनगर-रत्नापूर MIDC साठी १००० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. या निर्णयांसाठी अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याची प्रक्रिया आता कायदेशीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम २३० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्याने जमीनविषयक प्रकरणांचा निपटारा अधिक जलद होणार आहे.

या निर्णयांमुळे प्रशासनात वेग येणार असून विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!