Homeक्राईममोबाईलवर बोलत असताना डंपरचालकाकडून ; ५६ वर्षीय प्रौढाचा मृत्यू, संतप्त जमावाकडून तोडफोड

मोबाईलवर बोलत असताना डंपरचालकाकडून ; ५६ वर्षीय प्रौढाचा मृत्यू, संतप्त जमावाकडून तोडफोड

जळगाव : (प्रतिनिधी- विनोद पवार)जळगाव शहरात शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात ५६ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोबाईलवर बोलत भरधाव वेगाने डंपर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना कालीका माता मंदिराजवळ रात्री सुमारे ८ वाजता घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली.

रस्त्याने चालणे झाले अवघड

प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५६, मूळ रा. तेली चौक, जुने जळगाव, सध्या रा. ज्ञानदेवनगर) असे मृताचे नाव आहे. दिवसभर काबाडकष्ट करून सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. दुचाकीवरून जात असताना मोबाईलवर बोलत आणि गाणी ऐकत भरधाव निघालेल्या डंपर चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

बेशीस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी

अपघाताची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, याच ठिकाणी महिनाभरात झालेली ही दुसरी गंभीर घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. वाढत्या बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!