Homeताज्या बातम्याक्रीडाभारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; भारताचा सुपर ८ मध्ये प्रवेश

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; भारताचा सुपर ८ मध्ये प्रवेश

Times Of Maharashtra Desk:भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकस्पर्धेत आतापर्यंत २७ लीग सामने पूर्ण झाले आहेत. २७ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला होता. या टप्प्यापर्यंत तीन संघ स्पर्धेबाहेर गेले असून दोन संघांनी सुपर ८ मध्ये अधिकृत प्रवेश मिळवला आहे.

भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत सुपर ८ चे तिकीट निश्चित केले. त्याचबरोबर दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या वेस्ट इंडिजनेही सुपर 8 मध्ये स्थान मिळवले आहे. दुसरीकडे ओमान, नेपाळ आणि नामिबिया हे तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ग्रुप डी मधून अद्याप कोणताही संघ अधिकृतरीत्या पात्र किंवा अपात्र ठरलेला नाही.

ग्रुप A गुणतालिका

ग्रुप A मध्ये भारताने पहिले तीन सामने जिंकत ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या स्थानावर यूएसए आहे (४ पैकी २ विजय). तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे (३ पैकी २ विजय). नेदरलँड्सने ३ पैकी १ सामना जिंकला असून ते चौथ्या स्थानावर आहेत. नामिबियाने पहिले तीनही सामने गमावले असून ते स्पर्धेतून बाद झाले आहेत.

ग्रुप B गुणतालिका

ग्रुप B मध्ये श्रीलंका दोन विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेनेही पहिले दोन सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया २ पैकी १ विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. आयर्लंड 3 पैकी 1 विजयासह चौथ्या स्थानी आहे. ओमानने तीनही सामने गमावले असून ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

ग्रुप C गुणतालिका

ग्रुप C मध्ये वेस्ट इंडिजने पहिले तीन सामने जिंकून अव्वल स्थान मिळवले आणि सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित केला. इंग्लंड ३ पैकी २ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड ३ पैकी १ विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. इटली २ पैकी १ विजयासह चौथ्या क्रमांकावर आहे. नेपाळने तीनही सामने गमावले असून त्यांचा प्रवास संपला आहे.

ग्रुप D गुणतालिका

ग्रुप D मध्ये दक्षिण आफ्रिका ३ विजय आणि ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मात्र, अजून पात्रता अधिकृतरीत्या निश्चित झालेली नाही, कारण इतर दोन संघही ६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. तरी नेट रनरेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचे सुपर ८ मध्ये स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. न्यूझीलंड ३ पैकी २ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूएईने २ पैकी १ सामना जिंकला आहे. अफगाणिस्तान आणि कॅनडा यांनी प्रत्येकी दोन सामने गमावले असून ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

error: Content is protected !!