Homeताज्या बातम्याक्रीडाप्रचंड उत्साहात ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव संपन्न.मा. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते खेळाडूंचा...

प्रचंड उत्साहात ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव संपन्न.मा. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव.

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी-रुपेश देशमुख ):  ब्रम्हपुरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी आयोजित ब्रम्हपुरी क्रीडा महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साह, शिस्त आणि स्पर्धात्मक जिद्दीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.
तब्बल १६०० च्या वर खेळाडूंनी सहभाग नोंदवत मैदानावर क्रीडाप्रेमाची दिमाखदार झलक दाखवली.चंद्रपूर,आरमोरी,गडचिरोली-भामरागड,वर्धा,भंडारा,गोंदिया, अमरावतीसह विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी या क्रीडा महोत्सवाला व्यापक स्वरूप दिले.
वयोगट ६,८,१०,१२,१६, १८ वर्षे आणि ४० वर्षांवरील या विविध वयोगटांतील मुले मुली,महिला पुरुष जेष्ठ नागरिकांनी भाग घेतला.

धावणे,लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, रिले, फास्ट वॉक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक प्रकारातील प्रथम तीन क्रमांकांना मेडल्स,प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे सहभागी खेळाडूंना टी शर्टचे मोफत वाटप करण्यात आले.”

ब्रम्हपुरी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मान.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थान प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नामदेव कोकोडे,नगर परिषदेचे उपाध्यक्ष नितीन उराडे,कृष्णाजी भाईक माजी उपाध्यक्ष न प ब्रम्हपुरी.नगरसेवक राकेश पडोळे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके,नगरसेवक पुष्पाकर बांगरे,गाजी पटेल,पोपटे सर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उद्घाटक मा. आमदार विजय वडेट्टीवार साहे

उद्घाटनप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी ब्रह्मपुरीतील क्रीडावृत्तीचा विशेष उल्लेख करत सांगितले की, ब्रह्मपुरीत मोठे खेळाडू घडवण्याची ताकद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे तालुका स्तरीय क्रीडा संकुल येथे उभारले जात असून त्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढेही सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.त्यांच्या या घोषणेमुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.या क्रीडामहोत्सवामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी अत्यंत मोलाचा संदेश दिला. स्वतः उत्कृष्ट टेनिस आणि जलतरणपटू असलेले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. लाडूकर म्हणाले,ब्रह्मपुरीमध्ये विविध प्रकारचे खेळाडू आहेत. त्यांना उत्कृष्ट व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे आणि क्रीडा महोत्सव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न राहते आणि मनगट मजबूत होते. नियमित व्यायाम आणि खेळ खेळल्यास आजार दूर राहतात. डॉक्टर म्हणून सांगतो जर आपण नियमित खेळलो, व्यायाम केला तर दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही.त्यांच्या या थोडक्यात पण प्रभावी संदेशाने उपस्थित खेळाडू व पालकांना आरोग्य आणि क्रीडा यातील अतूट नाते अधोरेखित करून दिले.प्रत्येकाने कोणताही एक खेळ अंगीकारावा आणि नियमित व्यायाम करावा, असा सल्ला देत त्यांनी क्रीडेला जीवनशैली बनवण्याचे आवाहन केले.

बक्षीस वितरण समारंभ प्रा सुभाष बजाज यांचे अध्यक्षतेखाली डॉ. कुंदन दुपारे यांचे हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.यांनी ब्रह्मपुरीतील वाढत्या क्रीडाचळवळीवर प्रकाश टाकत सांगितले की, क्रीडा महोत्सव हे प्रतिभेला दिशा देणारे मंच आहे. खेळाडूचा वाढता सहभाग हा ब्रह्मपुरीच्या उज्ज्वल क्रीडाभविष्याचा संकेत आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता भविष्यात त्यांचे स्वतःचे होऊ घातलेले सभामंडप, सुविधा मोफत देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ अमित भांडारकर सेंट लुईस अमेरिका, डॉ पंकज लडके,महिला सभापती बबिता आमले,नगरसेवक सचिन राऊत,अनुकूल शेंडे,मोंटू पिलारे,वकार खान,पुष्पाकर बांगरे त्याचप्रमाणे भूषण रामटेके,सुधान्शु अलोने,मनीष महाजन, हँडबाल चे सुरज मेश्राम पत्रकार राहुल भोयर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रम्हपुरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देविदास जगनाडे यांनी केले. संचालन असोसिएशनचे सदस्य मुनिराज कुथे यांनी, तर आभारप्रदर्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊराव राऊत यांनी केले.
विशेष म्हणजे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या प्रसिध्द आंतरराष्ट्रीय अथलीट श्रीमती अनिता कुरे ह्या क्रीडामहोत्सवात उपस्थित होत्या.

वारीयर्स स्पोर्ट्स साकोली आणि युवा पलटण बेटाळा यांनी चॅम्पियनशिप मिळविली.

क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ब्रह्मपुरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,विशेषतः सचिव राहुल जुवारे,कोषाध्यक्ष रोहित बरडे,सदस्य,विशाल कानतोडे,कु. कविता घोरमोडे, महिला समितीच्या नंदिनी थापा,पूजा जुवारे आणि त्यांची टीम व युवा समितीचे तुषार पाचोरी तसेच सदस्य आणि पीआरडी स्पोर्ट्स क्लब,ट्रॅक अँड फिल्ड क्लबचे खेळाडू आणि विविध क्रीडा अकादमींचे सहकारी यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
चंद्रपूर जिल्हा ॲमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सर्व पंचांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धा सुरळीत पार पडल्या.

दानशूर मान्यवरांची  मदत

दानशूर मान्यवरांच्या मदतीने संपन्न झालेला, हा क्रीडा महोत्सव केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नव्हता तर तो ब्रह्मपुरीच्या क्रीडाशक्तीचा जागर होता. येथील खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावू शकतात, असा ठाम विश्वास या महोत्सवाने निर्माण केला आहे. ब्रह्मपुरीच्या मातीत असलेली खेळाची जिद्द नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!