Homeताज्या बातम्याकुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी संयुक्त मागणी ग्रामस्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट, मलकापूर यांच्या वतीने करण्यात आली. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष तथा ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

ग्राम कुंड खुर्द येथे समाजोपयोगी कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम तसेच विवाह सोहळे यांसाठी कोणतीही मोठी शासकीय वास्तू उपलब्ध नाही. त्यामुळे सामाजिक सभागृहाची अत्यंत आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असून अलीकडेच काही युवक शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी करण्यात आली.

गावातील आबालवृद्ध नागरिक, महिला मंडळ तसेच ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भीमराव नीतोने, रामभाऊ गवई, प्रतापराव बिराळे, संजय वानखेडे, सुखदेव गव्हाळे, जगदीश फुलपगारे, शिवा फुलपगारे, उमेश बाविसाने, चंद्रभान झनके, अमोल घाटे, प्रशांत इंगळे, जगदीश ठाकरे, सतीश सावळे, प्रशांत गवई, अरविंद सोनवणे, भोनाजी मोरे आदी उपस्थित होते.

गावकऱ्यांतर्फे राहुल झनके, राजू वानखेडे, सागर भगत, दिलीप झनके, संदेश झनके, सिद्धार्थ झनके, प्रवीण वानखेडे, प्रमोद झनके, अजय झनके, भास्कर झनके, विशाल भगत, पांडुरंग भगत, ज्ञानेश्वर भगत, संतोष वानखेडे, योगेश वानखेडे, मंगेश झाल्टे, आकाश झनके, सुमित झनके, प्रज्वल वानखेडे, कैलास झनके आदी उपस्थित होते.

महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा झनके यांच्यासह मंदाकिनी झनके, प्रमिला झनके, लता झनके, राजकन्या झनके, अनिता वानखेडे, लक्ष्मीबाई इंगळे, मिनाबाई झनके, कमलबाई इंगळे, रमाबाई झनके, रेखा कांबळे, अमृता इंगळे, माया वाकोडे, गिरजाबाई थाटे, कौशल्याबाई गवई, विमलबाई वानखेडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!