Homeउद्योगरेणापूरात अल्पभुधारक शेतकरी व महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात

रेणापूरात अल्पभुधारक शेतकरी व महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात

विष्णू आचार्य (लातूर जिल्हा प्रतिनिधी ) : परिवर्तन संस्था, सुमठाणा आणि जनविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रेणापूर तालुक्यातील मागासवर्गीय अल्पभुधारक, गायरानधारक शेतकरी तसेच महिला बचत गटांचा एकदिवसीय मेळावा उत्साहात पार पडला. बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता रेणापूर येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष चव्हाण होते. प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य डॉ. तातेराव वाघमारे, नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य, माधव सिरसाट आणि राहुल गंडले यांची उपस्थिती लाभली. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डॉ. तातेराव वाघमारे यांचा अल्पभुधारक व गायरानधारक शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागनाथ चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या जमीनदारांची नक्कल न करता रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि आरोग्यदायी अन्ननिर्मिती होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महिला बचत गटांनी लघुउद्योग सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. तातेराव वाघमारे, माधव सिरसाट, राहुल गंडले आणि सुभाष चव्हाण यांनीही उपस्थितांना शेतीविषयक नवतंत्रज्ञान, शासकीय योजना, बचत गटांची आर्थिक सक्षमता आणि ग्रामीण विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चिकटे यांनी केले, सूत्रसंचालन विष्णू आचार्य यांनी तर आभार प्रदर्शन डिगांबर चव्हाण यांनी केले.

या मेळाव्यास पानगाव, तत्तापूर, गरसुळी, डिगोळ (दे), आरजखेडा, पोहरेगाव आदी गावांतील शेकडो अल्पभुधारक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मेळाव्यानंतर गायरान जमिनींचे पंचनामे करून १-ई मध्ये नोंद घ्यावी, सरकारी गायरान जमिनीवर असलेल्या घरांची नोंद करून संबंधितांच्या नावावर जागा करावी आदी मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. या मागण्यांमुळे गायरानधारक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!