Homeमहाराष्ट्रमेरा युवा भारत अंतर्गत विमला विद्यालयात निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मेरा युवा भारत अंतर्गत विमला विद्यालयात निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विष्णू गायकवाड (गेवराई तालुका प्रतिनिधी ) : ‘मेरा युवा भारत’ बीड अंतर्गत रंगार चौक, गेवराई येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक विकासाला चालना देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमास प्रकाश त्रिभुवन (जिल्हा समन्वयक, मेरा युवा भारत, छत्रपती संभाजीनगर), कडुदास कांबळे (प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती), पांडुरंग खरात (गेवराई तालुका समन्वयक, मेरा युवा भारत) तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याध्यापक के. जी. जोगदंड यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेसाठी ‘सुभाषचंद्र बोस’, ‘विजयी दिवस’ आणि ‘माझ्या स्वप्नातील भारत’ हे विषय देण्यात आले होते. इयत्ता ८वी व ९वीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. मार्गदर्शन करताना कडुदास कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, लेखनकौशल्य व देशप्रेम जागृत करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

निकालात ८वी वर्ग : प्रथम : कु. काव्या अमोल कानपुरे द्वितीय : कु. वेदिका सुदर्शन वाईकर तृतीय : चि. वेद प्रमोद आमलेकर ९वी वर्ग : प्रथम : कु. ऋतिका लहू म्हेत्रे द्वितीय : कु. गौरी दादासाहेब खडके तृतीय : कु. ऋतिका सुदर्शन खुणे. विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. समारोपप्रसंगी मुख्याध्यापक जोगदंड यांनी ‘मेरा युवा भारत’च्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा स्पर्धा आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. परीक्षक म्हणून जवंजाळ के. एस., जिरेवाड सुनील मारुतीराव व घुगे एस. एस. यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांची लक्षणीय उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!