Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये ‘गौरवगाथा’ सन्मान सोहळा; डॉ. पी. व्ही. पाटील यांना रुग्णसेवेसाठी विशेष गौरव

जळगावमध्ये ‘गौरवगाथा’ सन्मान सोहळा; डॉ. पी. व्ही. पाटील यांना रुग्णसेवेसाठी विशेष गौरव

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : जळगाव येथे सकाळ समूह मार्फत आयोजित करण्यात आलेल्या “गौरवगाथा” या विशेष सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रक्षा खडसे (केंद्रीय राज्यमंत्री) उपस्थित होत्या.

या गौरव सोहळ्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसेच इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी वरणगाव येथील गणपती हॉस्पिटलचे डॉ. पी. व्ही. पाटील यांना मूळव्याध (पाइल्स) या आजारावर आधुनिक पद्धतीने यशस्वी उपचार करून रुग्णसेवा केल्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा केवळ गौरव नसून तो इतरांसाठी प्रेरणा देणारा क्षण असतो. अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सकाळ समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमास अरुण गुजराती (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा) तसेच महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!