Homeक्राईमस्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून चोरीच्या रिक्षा फिरवणाऱ्या सराईत चोराला बेड्या; काळेपडळ पोलिसांची...

स्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून चोरीच्या रिक्षा फिरवणाऱ्या सराईत चोराला बेड्या; काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई, १० लाखांच्या ६ रिक्षा जप्त

Times Of Maharashtra Desk : पुणे: शहरातून रिक्षा चोरी करून त्यांना भंगारात निघालेल्या (स्क्रॅप) रिक्षांचे नंबर लावून त्या वापरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला काळेपडळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १० लाख ७८ हजार रुपये किमतीच्या एकूण ६ रिक्षा जप्त केल्या असून, शहरातील ५ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. शादाब युसुफ अन्सारी (वय-२५ वर्षे, रा- गल्ली नं. २४, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

असा लागला छडा:

काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत (गु.रजि.नं. १०८/२०२६) रिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना काळेपडळ तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे, लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे आणि गिरीराज जगदाळे यांनी तब्बल १०२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यादरम्यान, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोखराई धरण (उंड्री, पुणे) येथे चोरीची एक रिक्षा (MH 12 SC 5223) झाडाखाली पार्क केलेली आहे.

​या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि रिक्षात बसलेल्या शादाब अन्सारी याला शिताफीने ताब्यात घेतले.

चोरीची पद्धत (Modus Operandi):

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आरोपीने एक धक्कादायक पद्धत वापरल्याचे निष्पन्न झाले. आरोपी शहरातून रिक्षा चोरायचा आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्या चोरीच्या रिक्षांवर स्क्रॅप (भंगार) झालेल्या रिक्षांचे नंबर प्लेट लावून त्या राजरोसपणे वापरत होता.

५ गुन्हे उघडकीस, ६ रिक्षा जप्त:

या आरोपीकडून काळेपडळ पोलिसांनी एकूण १०,७८,०००/- रुपये किमतीच्या ६ बजाज कंपनीच्या रिक्षा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खालील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत:

१. काळेपडळ पोलीस स्टेशन (MH 12 SC 5223 – किंमत १,९८,०००/-)

२. चंदननगर पोलीस स्टेशन (MH 12 HP RP 7571 – किंमत २,०५,०००/-)

३. आंबेगाव पोलीस स्टेशन (MH 12 KR 2876 – किंमत १,८८,०००/-)

४. संत तुकारामनगर पोलीस स्टेशन (MH 14 HM 2837 – किंमत १,९२,०००/-)

५. वानवडी पोलीस स्टेशन (MH 12 VW 7043 – किंमत १,९७,०००/-)

६. विनानोंदणी रिक्षा (MH 12 QE 5658 – किंमत ९८,०००/-)

​या पथकाने केली कारवाई:

ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अतुलकुमार नवगिरे, काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पो.हवा. प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंढरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप वेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!