Homeमहाराष्ट्रधुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : तालुक्यातील धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा २६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान पार पडणार असून ग्रामस्थ, तरुण मंडळे व महिला मंडळ यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, हरिनामाचा गजर आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण होणार आहे. तसेच सायंकाळी हरिपाठ, कीर्तन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या वाणीतून रामकथेचे निरूपण हे या सप्ताहाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमात विविध कीर्तनकारांचा सहभाग असून २६ मार्च रोजी चैतन्य महाराज देगलुरकर, २७ रोजी विशाल महाराज खोले, २८ रोजी शिवाजी महाराज नारायणगड, २९ रोजी उमेश महाराज दशरथे, ३० रोजी प्रकाश महाराज जवंजाळ तसेच ज्ञानसिंधु संदिपान महाराज हसेगावकर, ३१ रोजी पांडूरंग महाराज घुले यांची कीर्तने होणार आहेत.

सप्ताहाचा समारोप २ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत महंत स्वामी जनार्दन गुरु स्वामी निगमानंद महाराज, क्षेत्र मच्छिंद्रगड संस्थान यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तीमय सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!