Homeआरोग्यगेवराई तालुक्यात अल्पवयीनांच्या हाती स्टिअरिंग; अपघाताची टांगती तलवार

गेवराई तालुक्यात अल्पवयीनांच्या हाती स्टिअरिंग; अपघाताची टांगती तलवार

पालकांचे दुर्लक्ष की प्रोत्साहन? सुसाट वेगामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  शहरासह तालुक्यात सध्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे स्टिअरिंग दिसत आहे. ज्या वयात मुलांच्या हातात वह्या-पुस्तके असायला हवीत, त्या वयात ते रस्त्यांवर बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे संभाव्य अपघातांची भीती वाढली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांवर ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गेवराई–बीड मार्ग, गढी–माजलगाव रस्ता तसेच पाडळसिंगी–पाथर्डी मार्गावर अल्पवयीन मुले सुसाट वेगात आणि नियमांची पायमल्ली करत वाहने चालवताना दिसत आहेत. या बेफाम वाहनचालनामुळे पादचारी आणि इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

यामध्ये अधिक गंभीर बाब म्हणजे, काही पालक स्वतःच आपल्या मुलांना वाहने देत असल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असून, यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.

प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

अल्पवयीनांकडून होणाऱ्या या बेदरकार वाहनचालनावर लगाम घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. संबंधित मुलांवर तसेच त्यांच्या पालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

वेळ अजूनही गेलेली नाही
सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, मुलांच्या हट्टापायी त्यांना वाहन देणे टाळावे. अन्यथा एखाद्या मोठ्या अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य वेळी जागरूकता आणि कठोर अंमलबजावणी केल्यासच ही समस्या आटोक्यात येऊ शकते.

एकूणच, गेवराई तालुक्यात वाढत चाललेले अल्पवयीनांचे बेदरकार वाहनचालन ही गंभीर समस्या बनली असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!