Homeमहत्त्वाचेअमानी येथे राष्ट्रसंत कैकाडी महाराजांची ११९ वी जयंती उत्साहात साजरी; महाप्रसादाचे वाटप

अमानी येथे राष्ट्रसंत कैकाडी महाराजांची ११९ वी जयंती उत्साहात साजरी; महाप्रसादाचे वाटप

वाशिम (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : मालेगाव तालुक्यातील अमानी येथे राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कैकाडी समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

अमानी येथे कैकाडी समाजाने काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचा भव्य फलक उभारला असून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रांगणात तार कंपाउंड, प्रवेशद्वार तसेच शासनाच्या निधीतून पेवर ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

२६ मार्च रोजी सकाळी जयंतीनिमित्त महाराजांच्या फलकाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. तसेच कैकाडी बाबांची आरती आणि प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त आरती करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसंगी कैकाडी समाज बांधवांसह जाधव व माने परिवारातील महिला भगिनी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत कैकाडी महाराज (राजाराम भागुजी जाधव) यांचा जन्म १९०७ साली अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथे झाला. पंढरपूर येथे त्यांचा प्रसिद्ध मठ आहे. ग्रामीण भागात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध आणि अस्पृश्यता निवारण यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. अमानी येथेही त्यांनी कीर्तन-भजनाच्या माध्यमातून धान्य संकलन करून गरजूंना मदत केली होती. त्यांच्या नावाने ग्रामपंचायतजवळ धान्य भंडाराची खोलीही बांधण्यात आली आहे.

सध्या कैकाडी समाज संस्थान परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, येथे सभागृहाची आवश्यकता भासत असल्याने समाज बांधवांनी सभा मंडप उभारण्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार भावनाताई गवळी यांनी सभा मंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता तरी हा सभा मंडप मंजूर करून देण्याची मागणी समाज बांधव, भाविक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!