रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी/प्रतिनिधी) : ब्रह्मपुरी वनविभाग वनपरिक्षेत्र सिंदेवाही कच्चेपारला क्रिकेटचा ‘देव’ मानला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर सध्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या सफारीचा मनमुराद आनंद लुटत आहे. अलिकडेच सचिनने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेजवळ असलेल्या आणि ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ‘कच्चेपार’ या नवीन सफारी झोनला भेट दिली. या भेटीदरम्यान सचिनने इथल्या प्राणी आणि घनदाट जंगल त्यांना नेहमीच आकर्षित करते आणि तिथली शांतता त्यांना खूप आवडते.
नव्या सफारी झोनचे आकर्षण
ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्राव्यतिरिक्त, ब्रह्मपुरी वनविभाग वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही जवळील ‘कच्चेपार’ हे क्षेत्र सध्या वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

सचिन तेंडुलकरने कच्चेपारमधील तिथली शांतता पाहून सचिन थक्क झाला. त्यांनी या भेटीचे काही क्षण पाच ते दहा मिनिट , “निसर्गाची ही रूपे नेहमीच नवीन ऊर्जा देतात,” अशी भावना व्यक्त केली आहे.
सचिन तेंडुलकरने काही दिवसानंतर कच्चेपार जंगल सफारी करणार असे बोलून अधिकाऱ्यासमोर व्यक्त केले. तसेच ब्रह्मपुरी वनविभाग क्षेत्रातील हळदा येते भेट दिली असल्याचे समजते.
या भेटीतून त्यांनी जबाबदार पर्यटन आणि जंगल संवर्धनाचा संदेश चाहत्यांना दिला आहे.
विशेष म्हणजे जंगलाचे रक्षण करणाऱ्या वन कर्मचारी महिला वनरक्षक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.






















